- आज अचानक / पाऊस पाहुणा
- जाता तो जाईना / काय करू ?
- शेतामध्ये पीक / पावसाने ओले
- झाड-पान हाले / वेदनेने
- धुऱ्यावर उभा / शेतीचा मालक
- पावसाचा धाक / सतावतो
- वावरात कोबी / बाजूला सांभार
- डोयीचे अंबर / हासताये
- मेथी नि पालक / अशा ओल्या झाल्या
- पानावर अळ्या / खेळतात
- वांगे – टमाटर / तेही दूर-दूर
- डोळा महापूर / घर ओले
- पावसाने सारे / पिक मातीमोल
- पोशिंद्याचे हाल / स्वातंत्र्यात
- संसदेत गेली / माणसं हुशार
- जनता लाचार / घरी-दारी
- माती झाली ओली / सारे झाले ओले
- झरतात डोळे / एकांतात
- दिल्लीच्या वाटेने / निघाला बापडा
- आकाशी कावळा / आनंदित
- अर्जुन मेश्राम,
- लोक विद्यालय, गांगलवाडी
- ता. ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर
- ९६०४०१३६६७
- arjunmeshram001@gmail.com