- नशायुक्त पदार्थांच्या सर्रास विक्रीमुळे युवापिढीची बर्बादीकडे वाटचाल
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली अमलीपदार्थ व भेसळयुक्त खाद्यान्नावर बंदी घालण्याची मागणी
- शहाध्यक्ष प्रशांत डवरे यांच्या नेतृत्वात अन्न व औषधी प्रशासनाला घेराव घालीत निवेदन सादर
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : शाळा व महाविद्यालयांच्या परिसरामध्ये नशा होणाऱ्या पदार्थांची विक्री ताबडतोब बंद करण्यात यावी. तसेच सणासुदीच्या काळात शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होणारी भेसळयुक्त पदार्थांची विक्री रोखण्यात यावी. या मागणीला घेऊन मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर (जिल्हा) चे वतीने अन्न व औषध प्रशासन कार्यालयात निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. सद्यस्थितीत अमरावती शहरातील बहुतेक शाळा, महाविद्यालयांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नशा होणाऱ्या गांजा व गोळ्या पदार्थांची विक्री बिनधास्तपणे सुरु आहे. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थावर व शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. देशाचे भविष्य वाचविण्याकरिता तसेच शहराची बिघडत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याकरिता सह-आयुक्त-अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्याची बाब निदर्शनास आणून देत शहराध्यक्ष-प्रशांत डवरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन अन्न व औषध प्रशासन-शरद कोलते तथा औषध प्रशासन सह-आयुक्त-उमेश घरोटे यांना जाब विचारला. या सोबतच या विषयात लक्ष घालून नशा होणाऱ्या पदार्थांची विक्री ताबडतोब बंद करण्यात यावी. या मागणीचा निवेदनकर्त्यांच्या वतीने पुनरोच्चार करण्यात आला.
या दरम्यान दोन्ही सहआयुक्त महोदयांचे लक्ष वेधीत नागरिक व विद्यार्थ्याच्या आरोग्याकरिता हानिकारक ठरणाऱ्या खाद्य पदार्थांची विक्री होणार नाही. याची जबाबदारी संबंधित विभागावर असतांना या विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. तसेच विक्री केल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांची तपासणी करिता लागणारी ( टी. पी. सी.) अर्थात टोटल पोलार कंपाउंड यंत्र दोन जिल्हे मिळून एकच असल्याने कारवाई ला घेऊन संबंधित प्रशासन हतबल असल्याची बाब सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने अन्न व औषधी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली . सध्या सणासुदीच्या दिवसात विविध प्रकारचे खाद्यान्न तसेच मिठाईच्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात होणारी मागणी लक्षात घेता एफडीए ची यंत्रणा कुचकामी असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. शहरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर खाद्यपदार्थ, खाद्यान्न च्या उत्पादनाचे सॅम्पल (नमुने) घेऊन तपासणी करणे करिता दोन आठवड्यांचा कालावधी लागतो ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या बाबींकडे लक्ष केंद्रित करून अन्न व औषध प्रशासन विभागाचे वतीने भेसळयुक्त पदार्थांची होणाऱ्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी. अन्यथा शहरामध्ये विक्री केले जाणारे भेसळयुक्त पदार्थ संबंधित विभागाला भेट दिल्या जातील. असा इशारा सुद्धा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आला.
निवेदन सादर करतांना शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांच्या समवेत माजी नगरसेवक-रतन डेंडूले, अशोकराव हजारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक चे अध्यक्ष-ऋतुराज राऊत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विद्यार्थी चे अध्यक्ष-आकाश हिवसे, हाजी रफिक भाई, भोजराज काळे, दिलीप शिरभाते, आनंद मिश्रा, गजानन बरडे, समीर चौधरी, दिलीप धोटे, संदीप आवारे, प्रमोद महल्ले, अमोल देशमुख, श्रीकांत झंवर, निलेश शर्मा, प्रशांत महल्ले, संजय मलनकर, मनोज केवले, संजय गायकवाड, दिनेश मेश्राम, संकेत बोके, अनिकेत मेश्राम,अक्षय पळसकर, अभिषेक धुरजड,अक्षय बुरघाटे, मनिष पाटील, प्रमोद धनाडे,सचिन दळवी, दिलीप कडू, प्रिया कडू, अलका कोकाटे, जयश्री शिरभाते,दिग्विजय गायगोले,शैलेश अमृते, नादिममुल्लासर,सनाउल्ला खान, दिलबर शाह, अबरार साबीर, प्रतीक भोकरे, फिरोजशहा, मोईन खान,आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.