- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस उपायुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून तो दि. 14 सप्टेंबर पासून ते दि. 28 सप्टेंबर 2022 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्र.पोलीस उपायुक्त (अमरावती शहर) प्रशांत राजे यांनी कळविले आहे.
- (छाया : संग्रहित)