- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या २०२०-२१ मध्ये झालेल्या माझी वसुंधरा २.० स्पर्धेत अमरावती महानगरपालिकेने अमृत गटात विभाग स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करीत रविवार ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभुमीवर प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला.
पंचतत्त्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या या स्पर्धेत “अमृत” गटामध्ये विभागस्तरावर अत्युत्कृष्ट कामगिरीकरिता अमरावती महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांनी माझी वसुंधरा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल माजी गटनेता चेतन पवार व बाळासाहेब होले यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.