- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती पदवीधर मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणुक आयोगाने या मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यापासून ते या निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू राहील.
30 जानेवारी 2023 रोजी अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी मतदान आणि 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 5 जानेवारी 2023 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. 12 जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. 13 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. 16 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येईल.
या निवडणुकीच्या आदर्श आचार संहिता कालावधीमध्ये निवडणुक प्रचारार्थ कार्यासाठी किंवा निवडणुकीशी संबंधीत दौऱ्यासाठी मंत्री, राज्यमंत्री, स्थानिक स्वराज संस्थांचे पदाधिकारी, राजकिय पक्षाचे उमेदवार, इत्यादी व्यक्तींना शासकीय वाहनांचा वापर करता येणार नाही. अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–