- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : महाडीबीटी पोर्टलवरील सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील भारत सरकार मेट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज विहित मुदतीत निकाली काढण्याबाबत समाज कल्याण विभागाकडून वारंवार महाविद्यालयास लेखी कळविण्यात आले होते. तथापि, विद्यार्थी व महाविद्यालयाकडून विहित मुदतीत अर्जावर कार्यवाही न केलेले अर्ज महाडीबीटी ॲडमीनकडून ऑटो रिजेक्ट करण्यात आले असून सदर अर्ज महाडीबीटी पोर्टलवर पुनर्विचारार्थ मंजुरीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे.
महाडीबीटी पोर्टलवर सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील भारत सरकार मेट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे पुनर्विचारार्थ मंजुरीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अर्जाची नियमानुसार संबंधित प्राचार्य यांनी पडताळणी करून पात्र अर्ज संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाचे लॉगिनला तात्काळ पाठविण्यात यावे.
विद्यार्थ्यांकडून अर्जातील त्रुटी पूर्तता करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांची असून यानंतर महाडीबीटी Admin कडून अर्ज Auto Reject झाल्यास व पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्याची राहील. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयास कोणत्याही प्रकारचे मेट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेले शुल्क वसूल करता येणार नाही.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मेट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज सुरळीत पडताळणी करुन तत्काळ पोर्टलवर सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–