- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भूजल योजना अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरूड व चांदूरबाजार या तालुक्यातील 93 ग्रामपंचायतींमध्ये सिमासेस लर्निग कंपनी पुणे मार्फत विविध प्रशिक्षण घेण्यात येत आहे. श्री.संजय कराड वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण कार्यक्रम 26 डिसेंबर 2022 पासून सुरू करण्यात आला असून 5जानेवारी 2023 रोजी प्रशिक्षणाचा प्रथम टप्पा पूर्ण झाला आहे. याप्रकारे एकूण 6 प्रशिक्षण कार्यक्रम हे 8मार्च पर्यंत गावस्तरावर आयोजित केले जाणार आहेत. सदर प्रथम टप्प्यातील प्रशिक्षण हे माहिती शिक्षण संवाद आणि समुदाय एकत्रीकरण या विषयांवर आधारित होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी सीमासेस लर्निग कंपनी पुणे यांचेमार्फत अमरावती जिल्ह्यासाठी 2 प्रशिक्षण समन्वयक व 6 मास्टर ट्रेनर नेमण्यात आले आहे. सदर प्रथम टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. संजय कराड वरीष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अमरावती यांनी पिंपरी थुगाव येथून केले.
सदर प्रशिक्षण प्रत्यक्ष गावपातळीवर घेण्यात आले असून यामध्ये गावाचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक, विहीर मालक, शेतकरी, जल सुरक्षक, भुजलमित्र, महिला गट, पोलिस पाटील,आशा वर्कर, रोजगार सेवक, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्य इत्यादीसोबत संवाद साधून अटल भूजल योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अटल भुजल योजनेच्या माध्यमातून उपलब्ध भूजलाचे लोकसहभागातून योग्य नियोजन व व्यवस्थापनाद्वारे सिंचनाकरिता भूजलाचा कार्यक्षम वापर करून जास्तीत जास्त भूजलाची बचत करणे ही काळाची गरज असल्याचे लोकांना पटवून देण्यात आले. या अनुषंगाने गावातील सर्वांनी लोकसहभागातून पाणी बचतीच्या उपाययोजना प्राधान्याने राबविण्याबाबत व त्याकरता गावातील सर्व विहिरींचे पुनर्भरण व ठिबक सिंचन पद्धती हा कार्यक्रम अधिक प्रमाणात राबवण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
सदर गावस्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबावणी होण्यासाठी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष,भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी, भूवैज्ञानिक व विषय तज्ञ यांच्या मार्फत पाठपुरावा करण्यात येतो व प्रशिक्षणास भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात येते. अटल भूजल योजनेतील गावस्तरावर प्रत्यक्ष काम करणारी जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्था DIP मधील स्थानिक समन्वयक, विषय तज्ञ व समुह संघटक यांनी प्रथम टप्प्यातील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–