Contents
hide
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत अचलपूर तालुक्यातील माजी सैनिक, विधवा, अवलंबित व्यक्ती यांचा बुधवार, दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी अचलपूर तहसिल कार्यालय, नवीन सभागृहात सकाळी 11 वाजता सैनिक मेळावा आयोजित केला आहे. अचलपूर तालुक्यातील सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबित व्यक्ती यांनी या मेळाव्याला हजर राहण्याचे आवाहन अचलपूर तहसिलदार व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी केले आहे.
माजी सैनिक, विधवा तसेच अवलंबितांना दैनंदिन जीवनात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच सेवारत सैनिक यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.