- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सव ॲग्रोटेक 2022 चे आयोजन दि. 27 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी केले आहे.
डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या 124व्या जयंती दिनानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विज्ञान महाराष्ट्र शासन व आत्मा, अकोला जिल्हा परिषद तसेच संघटन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अकोला कृषी विद्यापीठ येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, शेतकरी व कृषी तज्ज्ञ तसेच शास्त्रज्ञ यांच्यात थेट संवाद निर्माण व्हावा, शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, शेतकऱ्यांना चांगला कृषी भाव मिळावा, शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, यासाठी या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प संचालक (आत्मा) अर्चना निस्ताने यांनी दिली.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–