स्वामी विवेकानंद बेलपुरा प्रभागात युवा स्वाभिमान पार्टी उमेदवारांनी प्रचारात मारले मैदान, विकासाचा मुद्दा ठरतोय निर्णायक
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंद बेलपुरा प्रभाग क्रमांक 12 मध्ये युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. विकासाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, हाच मुद्दा निवडणुकीत निर्णायक ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

या प्रभागातून युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार संजय भगवान माऊलकर, ऍडव्होकेट सौ. प्रीती हर्षल रेवणे (बनारसे), सौ. अर्चना गणेश तालन व निखिल उर्फ छोटू आकोटकर यांनी घराघरांत जाऊन, गल्लोगल्ली संपर्क साधत मतदारांशी थेट संवाद साधला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता, महिला व युवकांच्या समस्या यावर उमेदवारांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
प्रचारादरम्यान विकासकामांचा ठोस आराखडा मांडण्यात आला असून, पारदर्शक प्रशासन, लोकाभिमुख निर्णय व नागरिकांच्या सहभागातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मतदारांचा कल युवा स्वाभिमान पार्टीकडे झुकताना दिसत आहे.
सध्या संपूर्ण स्वामी विवेकानंद बेलपुरा परिसरात युवा स्वाभिमान पार्टीची चर्चा जोरात असून विरोधकांचा प्रचार तुलनेने फिका पडल्याचे चित्र आहे. नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, विकासाचा मुद्दा मतदारांच्या निर्णयावर मोठा प्रभाव टाकत असल्याचे स्पष्ट होत आहे.
एकूणच, प्रभावी प्रचार, विकासाभिमुख दृष्टीकोन व संघटित उमेदवारांची टीम यामुळे स्वामी विवेकानंद बेलपुरा प्रभाग क्रमांक 12 मध्ये युवा स्वाभिमान पार्टीने प्रचारात मैदान मारल्याचे चित्र सध्या ठळकपणे दिसून येत आहे.