Thursday, February 19

सुरेखा तडाके यांचा तडाखा सीबीडी बेलापुरात भाजपला बसणार ?

सुरेखा तडाके यांचा तडाखा सीबीडी बेलापुरात भाजपला बसणार ?

नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेतील प्रत्येक जागा भाजप ने प्रतिष्ट्येची केली असून आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सगळ्या जागा जिकूंन दाखवा! हा घरचा आहेर दिला आहेच.त्यात आमदार म्हात्रे याचं होम ग्राउंड असलेल्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधून आमदार म्हात्रे यांच्या मर्जीतील एकही उमेदवार नसल्या मूळे विरोधकांना ही निवडणूक सोपी जाईल का? अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

प्रभाग क्रमांक अठ्ठावीस (अ )मधून खरी लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )रंगणार आहे.तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )गटाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा आनंदा तडाखे यांची बाजू मजबूत असल्याच दिसून येत आहे. नुकतेच त्त्यांच्या प्रचारा साठी प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रचार फेरी काढून वातावरण निर्मिती केल्याचं प्रभागात फिरल्यावर लक्षात येतच.त्याच बरोबर अनेक सामाजिक मंडळे वं राहिवासी संघ यांनी ही सुरेखा तडाके यांना जाहीर पाठींबा दिल्या मूळे त्याचं पारड जड असल्याचे तूर्तास तरी दिसत आहे.त्याचें चिरंजीव राष्ट्रवादी तालुका प्रमुख असल्यामुळे मूळे त्त्यांचा जनसपंर्क दांडगा आहे.शिवाय तरुण वर्गात त्त्यांचा प्रभाव असल्यामुळे ती देखील तडाकें यांची जमेची बाजू असल्याच समजून येत आहे.

नवी मुंबई म्हणरपालिकेत प्रथमच पॅनल पद्धत असल्यामुळे ज्यांचा पूर्ण प्रभागात जनसपंर्क दांडगा आहे,त्या उमेदवाराला ही निवडणूक जिकंने सोपं असल्याचे ही बोललं जात आहे.तडाके यांची पूर्ण प्रभागात गेल्या कित्येक वर्ष्या पासुन उठ,बस असल्यामुळे मूळे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस(अ)मधून त्या बाजी मारतायत की भाजप आपला गड राखतो हॆ मात्र जनतेला सोळा तारखेलाच समजेल.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.