गौरव प्रकाशन खंडाळा (जि. यवतमाळ) : खंडाळा येथे झालेल्या एका सामाजिक जागृती कार्यक्रमात सुप्रसिद्ध विद्रोही कवी विजय ढाले यांनी जिल्हा परिषद शाळांचे संरक्षण, शिक्षणातील बाजारीकरण आणि गावगाड्याच्या शैक्षणिक शोषणाविरोधात परखड मत व्यक्त केले.
गावातच शिक्षण देणं म्हणजे संस्कार टिकवणं – ढाले
“शेठजी, भटजी, बनिया यांनी शिक्षणाचा बाजार मांडणं समजून घेता येईल, पण ज्या शिक्षकांची संपूर्ण कारकीर्द जिल्हा परिषद शाळांमुळे घडली, त्यांनीच निवृत्तीनंतर कॉन्व्हेंट शाळा सुरू करून शिक्षणावर व्यापार करणं, हे दुर्दैवी आहे,” असे ढाले यांनी ठासून सांगितले.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
शासकीय शाळा बंद करण्यामागे पद्धतशीर षड्यंत्र
ढाले यांनी आरोप केला की, शाळा दत्तक योजना, शाळा समायोजन धोरण आणि शिक्षण क्षेत्रातील नव्या तथाकथित सुधारणा या गावातील शासकीय शिक्षण नष्ट करण्याचे प्रयत्न आहेत. हे धोरणे गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ठरत आहेत.
शासनाच्या धोरणांविरोधात ठाम लढा
कवी विजय ढाले हे किडनी दान आंदोलन, भिक मांगो आंदोलन, आणि शिक्षण बचाव आंदोलन यांसारख्या विविध सामाजिक चळवळींत सक्रिय आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, “प्राथमिक शिक्षण गावातच द्या, संस्कारही टिकतील आणि पैसा वाचेल.“
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
गावकऱ्यांचा जागरूक प्रतिसाद
या भाषणाचा गावकऱ्यांवर मोठा प्रभाव पडला. खंडाळा गावातील २०-२२ पालकांनी आपली मुलं खासगी शाळांतून काढून गावातील जिल्हा परिषद शाळेत दाखल केलं. या कृतीने शासकीय शाळांवरील विश्वास अधोरेखित झाला आहे.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमात प्राचार्य प्रशांत गावंडे (डी.ई.टी. यवतमाळ) यांनी “आई-बाबा” या विषयावर मनोगत व्यक्त केलं. तसेच गट शिक्षणाधिकारी इक्बाल साहेब, सरपंच कविता उभाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवी राठोड यांची उपस्थिती होती.