
विदर्भाचे सौंदर्य : नागपूर ते चिखलदरा, ताडोबा, पेंच व आनंदवनची सफर
नागपूरच्या आसपास विदर्भात बरेच रमणीय, प्रेक्षणीय स्थळे आहेत उदाहरणार्थ टेकडी गणपती मंदिर हे तीर्थक्षेत्र असून पर्यटन सुद्धा आहे 12 व्या शतकात हेमाद्री पंडितांनी बांधले आहेत गणेश मूर्ती 250 ते 300 वर्ष जुने आहे. 1866 स* रेल्वे स्थानकाच्या कामासाठी टेकडीचा पूर्व भाग सुरंग लावून खोदकाम सुरू असताना गणपतीची शेंदूर लावलेली मूर्ती निघाली त्यावेळी हा भाग रेंजीमेंटल असल्यामुळे अधिक खोद काम करता आले नाही.
1926 झाली या मंदिराला टिनाचे शेड बांधण्यात आले 1955 स* नवीन मंदिर बांधण्यात आले. या देवस्थानाची मान्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर असून परदेशातून सुद्धा भाविक दर्शनासाठी येत असतात विदर्भातील अष्टविनायकामध्ये या गणपतीची गणना होते. जानेवारीत तीळकुंद चतुर्थीच्या दिवशी भव्य यात्रा भरते व कमीत कमी दोन लाख भाविक दर्शनास येतात.
त्याचप्रमाणे आदासा धापेवाडा आणि देवी मंदिर कोराडी हे सुद्धा अतिशय सुंदर तीर्थक्षेत्रच आहेत. आदासा धापेवाडा, पेंच, ताडोबा, नवेगाव बांध चिखलदरा बाबा आमटे यांचा आनंदवन तसेच भामरागड हेमलकसा, वगैरे वगैरे भोसले कालीन, रामाचे तीर्थक्षेत्र रामटेक नागपूर पासून 70 – 80 किलोमीटर असून सुंदर आहे आजही त्रिपुरी पौर्णिमेला रात्री त्रिपुर जाळत बघण्यासारखे आहे .
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
जवळच खिंडसी तलाव आहे रमणीय पिकनिक स्पॉट, पेंच व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प हा पेंच नदीमुळे विभागला गेला त्याचा निम्मा भाग महाराष्ट्रात व निम्मा भाग मध्य प्रदेशात येतो. नदी म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची सीमारेषा आहे . एखाद्या राज्याच्या सीमेवरून दुसऱ्या राज्याच्या प्रदेशांतील काय गंमत असते याची कल्पनाच करू शकत नाही.
ते तुम्हाला शब्द सांगायलाच नको जंगलात सफारी करताना पण एक वेगळाच आनंद असतो. त्यातल्या त्यात प्रत्यक्ष समोर सगळे प्राणी बघायला मिळाले तर विचारूच नका, त्याचप्रमाणे नवेगाव बांध ताडोबा व्याघ्र प्रकल्प ताडोबाला जाण्यासाठी चार गेट आहेत .नवेगाव बांध कडून एक गेट अंधारीच्या जंगलाचा काही भाग ताडोब्याला जोडल्यामुळे ताडोबाची वन संपदा व वन संख्या वाढली आहे.
ताडोबातील पंचधाराकडे जाताना एक गवताळ मैदान आहे पंचधाराकडून ताडोबा तलावाकडे जाताना कच्चा रस्ता आहे. तिथे कधी वाघाचे पंजे, पावलांचे ठसे दिसून येतात, त्यावरून किती वेळापूर्वी वाघ इथून गेला आहे त्यांचा अंदाज घेऊ शकतो. ताडोबा गेट जवळ विस्तीर्ण जलाशय आहे ते दृश्य बघून निसर्गाचे सुख मिळते तलावाकाठी एक छोटेसे संग्रहालय आहे 1998 मध्ये मारलेल्या नरभक्षाला भुसा भरून ठेवले आहे.
विदर्भाचे नंदनवन, पावसाळ्यात निसर्ग अनुभवावा तर इथंच, पर्यटकांसाठी मोठी पर्वणी,
या नरभक्षाने तीन माणसे मारले आहेत अशी माहिती आहे काटेझरी गावाकडे जाताना दोन्ही बाजूला बांबूंची दाट वने आणि मध्ये कच्चा मातीचा रस्ता आहे, स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असावा असे कोणालाही वाटणार नाही. बाबा आमटेंचा आनंदवन तसेच भामरागड व हेमलकसा हे तर सर्वांच्याच माहितीतले असावे.
आमटे परिवाराबद्दल तर बोलायलाच नको त्यांची कौतुक करणारे आपण कोण? परमेश्वरानेच त्यांना जन्मजात कौतुकास्पद एक वेगळी शक्ती, वेगळी आगळी जीवनशैली दिलेली आहे त्या ठिकाणाला एकदा तरी भेट नक्कीच द्यावी. तिथला निसर्ग तिथले वातावरण तिथे राहणाऱ्या लोकांचे जीवन बघितल्यावर असे वाटते की आपण या जगात फालतू आहोत वरोराच्या आनंदवन खरोखरीच दुःखी अपंग बे सहारा लोकांसाठी खरंच ते आनंदवनच आहे.
भामरागड हे म्हणजे कसा आहे एक गाठ बांबूंचे जंगल आहे तिथे आदिवासी लोकांची वस्ती आहे. त्यांना आपली भाषा सुद्धा कळत नसे, गोरे किंवा सावळे लोक दिसले की ते आदिवासी घाबरायचे. पण आता हळूहळू बरीच सुधारणा झालेली आहे. आमटे परिवाराने त्यांना माणसात आणले आहे.
त्यांना खायला जंगली फळे मास अंगाला झाडांची पाने नाहीतर नग्नच राहायचे पण आता जवळपास सर्वच बदललेले आहे कसे राहायचे कसे खायचे वगैरे त्यांच्या मुलांना शिक्षण काम वगैरे आमटे परिवाराने त्यांना सर्व शिकवले आहे.
- नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

बांबूंच्या वेगवेगळ्या वस्तू बनवतात आणि बाजारात त्या विकायला पण असतात जंगली वनस्पती पासून काही औषधी पण तयार होते तिथली काही मुले उच्च शिक्षणासाठी काही नोकरीसाठी प्रदेशात सुद्धा गेलेली आहेत. खरोखरच आमटे कुटुंबीयांनी केलेली तडजोड स्वतःला पूर्णपणे वाहून दिलेले आहे हे वाखळण्याजोगे आहे.
तसेच सर्व प्राणी आणि जनावरे सुद्धा त्यांच्या इतक्या जवळचे झालेले आहेत उदाहरणार्थ वाघ अस्वल, हरिण, साप वगैरे वगैरे अगदी स्वतःला डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या जवळ जाऊन त्यांना प्रेमाने जवळ घेतात आणि ते प्राणी सुद्धा त्यांचे सर्व ऐकतात. जणू एक दुसऱ्यांची भाषा समजतात.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
खरोखरच आमटे कुटुंबियांनी केलेली तडजोड संघर्ष वाखाण्याजोग आहेत त्यांनी पूर्णपणे स्वतःला सेवेत राहून दिलेले आहेत. आता आपण अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा कडे वळूया चिखलदरा हे थंड ठिकाण मानल्या जाते खोल खोल दरी आणि पहाड आणि सुंदर व्हॅली तसेच हिरवळ पण बघण्यासारखी आहे.
विदर्भाच्या सौंदर्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे असा हा आमचा विदर्भ हिरवी झाडे आणि तांबड्या मातीचा रस्ता सुंदर तीर्थक्षेत्रे आणि रमणीय सौंदर्याने भरपूर आनंद देणार आहे.
–हर्षा वाघमारे
नागपूर
९९२३८१९७५२