“पीक विम्यापासून यवतमाळ वंचित; शेतकऱ्यांच्या हाती आश्वासनाचे ‘गाजर’?”
“पीक विम्यापासून यवतमाळ वंचित; शेतकऱ्यांच्या हाती आश्वासनाचे ‘गाजर’?”गणेश देशकरीदारव्हा (जि. यवतमाळ) | तालुका प्रतिनिधी : खरीप हंगाम 2025 साठी काढलेल्या पीक विम्याचा लाभ अद्याप मिळाला नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. शासनाने एक रुपयात मिळणारी विमा योजना बंद करून शेतकऱ्यांकडून स्वतःचा हिस्सा भरून विमा काढण्यास भाग पाडले. आर्थिक अडचणीत असतानाही शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसणवार करून विमा भरला; मात्र आजपर्यंत विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमा कंपन्या आणि प्रशासन संगनमत करून जाचक अटी व निकष लादत आहेत. पीककापणी प्रयोग, सरासरी उत्पादन, मागील वर्षांचा डेटा अशा क्लिष्ट प्रक्रियेमुळे सामान्य शेतकरी अडकतो आणि त्यातून विमा कंपन्या मोठा फायदा करून घेतात. प्रत्यक्षात नुकसान होऊनही शेतकऱ्य...
