भारताच्या विश्वविजेत्या वीरांगना: बीसीसीआयचा ५१ कोटींचा मानाचा मुजरा!
मुंबई : नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघाने अभूतपूर्व पराक्रम साधला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला ५३ धावांनी पराभूत करत महिला वनडे विश्वचषक 2025 आपल्या नावे केला. भारताने प्रथम फलंदाजी करत २९९ धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव २४६ धावांवरच कोसळला. या विजयानंतर देशभरातून महिला संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच, बीसीसीआयनेही ऐतिहासिक निर्णय घेत ५१ कोटी रुपयांचं भव्य बक्षीस जाहीर केलं आहे.बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी ही घोषणा करताना सांगितलं की, या पुरस्कारात खेळाडूंसह कोचिंग स्टाफ, निवड समिती आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल. त्यांनी या विजयाचं श्रेय आयसीसी चेअरमन जय शाह यांच्या दूरदृष्टीला दिलं. शाह यांच्या प्रयत्नांमुळे महिला क्रिकेटमधील पुरस्कार रक्कमेत तब्बल ३०० टक्क्यांनी वाढ करण्य...
