Thursday, November 20

Tag: #VulcanVillage #InspirationalStory #MarathiMotivation #LifeLesson #TrueStory #Perspective #HistoryStory #MarathiArticle #MotivationalKatha #USAStory

व्हल्कन गावाची प्रेरणादायी कथा: छोट्या समस्येने जग हलवले!
Story

व्हल्कन गावाची प्रेरणादायी कथा: छोट्या समस्येने जग हलवले!

सत्तरचं दशक. जगभर शीतयुद्धाची धग. अमेरिका आणि रशिया—दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी प्रत्येक क्षण सज्ज. त्या महासत्तांच्या खेळामध्ये एक छोटंसं गाव मात्र शांतपणे, आपल्या छोट्याशा समस्येसह जगत होतं. नाव व्हल्कन. अमेरिकेच्या नकाशावरून शोधल्याशिवाय सापडणारही नाही असं अगदी लहान गाव.१९५०च्या दशकात इथे कोळसा खाणींची गजबज होती. कामगारांची धावपळ, बाजाराची चहलपहल, घराघरांतले दिवे. पण खाणी बंद झाल्या आणि गाव जणू प्राणविहीन झालं. १९७०च्या आसपास तर इथे फक्त २० कुटुंबं उरली. नदीच्या काठावरचं, एकटं, शांत, आणि विस्मृतीत गेलेलं हे गाव.नदीचा एक भाग वेस्ट व्हर्जिनियात, तर दुसरा केंटकी राज्यात होता. मुलांना शाळेत जायचं म्हणजे नदी ओलांडावी लागायची. पण गावाचा जुना पूल तुटून पडलेला. त्यामुळे मुलांना रोज एक भीषण प्रवास करावा लागायचा लॉक केलेल्या रेल्वेच्या कुंपणावरून चढून, नंतर मालगाड्या धावतात त्...