गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!
गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!बाप गेला, आई गेली. तरीही कष्ट करत, असेल त्यात हार न मानता जगत राहिला. सरळमार्गी स्वप्न बघत राहिला.. कधी कुणाच्या शेतात ओझी उचलत राहिला तर कधी स्वतःच स्वतःची पाहिलेली स्वप्न कुचलत राहिला.. जगण्याच्या आरुडात तो शोधत राहिला मनाला विरंगुळा.. कधी अर्धपोटी तर कधी उपाशीपोटी.. कधी निवद नारळ खाऊन तर कधी फाटकं तुटकं लेऊन.. आहे त्या परिस्थितीत काहीतरी बदल होईल या आशेवर एकेक दिवस येत होता, जात होता.. तरीही खचला नाही.. ना कुणाच्या वळचणीला गेला, ना कुणाला काही त्रास दिला.. तो चार भिंतीच्या शाळेत कमी अन् भाकरीच्या शोधात जास्त शिकत राहिला.. बरं.. आई बाप गेल्यानंतर त्याचा आधार होता तो त्याच्या पाच बहिणी व आत्याचा.. त्याही रोज जगण्याची लढाई लढत बिकट परिस्थितीतून वाट काढत चाललेल्या.. फाटक्याला तुटक्याचा आधार असेच म्हणता येईल.. पण त्याचे भाचा व भाची त्याला काहीबाही सांगत होती.. शिक...
