सर्वोच्च न्यायालयात शूज फेकण्याची धक्कादायक घटना; सरन्यायाधीश बी. आर. गवई ठाम
सर्वोच्च न्यायालयात शूज फेकण्याची धक्कादायक घटना; सरन्यायाधीश बी. आर. गवई ठामसोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने शूज फेकले. सुदैवाने तो शूज सरन्यायाधीशांच्या बेंचपर्यंत पोहोचला नाही. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.घटनेनंतर सरन्यायाधीश गवई म्हणाले, “अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणार नाही. कृपया सुनावणी पुढे चालू ठेवा.” प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शूज फेकणारा वृद्ध व्यक्ती “हिंदुस्तान सनातनचा अपमान सहन करणार नाही” असे घोषणा देत न्यायाधीशांच्या बेंचकडे शूज फेकत होता. न्यायालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले.माहिती नुसार, त्या व्यक्तीकडे सर्वोच्च न्यायालयातील वकील व क्लार्क यांना दिले जाणारे प्रॉक्सिमिटी कार्ड होते. त्यावर किशोर राकेश असे नाव नोंदलेले आह...
