शिवसेना पक्ष चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली; १२ नोव्हेंबरला होणार अंतिम युक्तिवाद
शिवसेना पक्ष चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली; १२ नोव्हेंबरला होणार अंतिम युक्तिवादनवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह “धनुष्यबाण” यावरील मालकी हक्काच्या वादावर आज, मंगळवार (८ ऑक्टोबर २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद सुरू केला. मात्र, काही कारणांमुळे आजची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही आणि अखेर न्यायालयाने ही सुनावणी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल असे जाहीर केले.सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकर लागणे आवश्यक आहे.” त्यांनी आपल्या युक्तिवादासाठी किमान ४५ मिनिटांचा वेळ देण्याची विनंती केली. तथापि, दुसऱ्या बाजूच्या वकिलांच्या वारंवार हस...
