एकतेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्टेशनवर ३७व्या जनआंदोलनातून साजरी अनोखी दिवाळी
एकतेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्टेशनवर ३७व्या जनआंदोलनातून साजरी अनोखी दिवाळीएकतेचा संदेश देत शकुंतला रेल्वे स्टेशनवर एक अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या ३७व्या प्रतीकात्मक जनआंदोलनातून ही दिवाळी सामाजिक एकतेचा दीपोत्सव ठरली. दिवाळीचा उत्सव सामान्यतः प्रत्येकजण आपल्या घरात साजरा करतो; परंतु या वेळेस नागरिक, महिला, बालगोपाल, व्यापारी आणि सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन रेल्वे स्टेशन परिसरातच आनंदोत्सव साजरा केला. विषमतेचा अंधार दूर करून एकतेचा प्रकाश जागविण्याच्या हेतूने शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीने हा अभिनव उपक्रम हाती घेतला.अचलपूर रेल्वे स्टेशनवर दुपारी चार वाजता स्वच्छता अभियानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती, माहेर फाउंडेशन, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, जमात-ए-इस्लामिक महिला संघटन, मानव सेवा समिती, व्य...
