राहुल गांधींचा जलमय प्रचार! मच्छिमारांसोबत उतरले तळ्यात, बिहारमध्ये ‘देसी अंदाज’ चर्चेत
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगात आली असून, प्रमुख नेत्यांचे दौरे आणि सभा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी बेगुसराय येथे प्रचारासाठी दाखल झाले. नेहमीप्रमाणे भाषणांमधून केंद्र व राज्य सरकारवर टीका करण्याबरोबरच, यावेळी त्यांनी एक वेगळा प्रयोग केला थेट लोकांमध्ये उतरून त्यांचा जीवनानुभव जाणून घेण्याचा.सभेपूर्वी राहुल गांधी स्थानिक मच्छिमार बांधवांना भेटण्यासाठी बेगुसरायमधील एका तळ्याकाठी पोहोचले. पारंपरिक पोशाखात त्यांनी अचानक तळ्यात उडी घेतली आणि स्थानिक मच्छिमारांसोबत मासेमारी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या "देसी अंदाजाचा" व्हिडिओ काँग्रेस पक्षाने आपल्या 'एक्स' (पूर्वीच्या ट्विटर) अकाऊंटवर शेअर करताच काही तासांतच तो व्हायरल झाला.या जलमय अनुभवातून राहुल गांधींनी मच्छिमार बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन संघर्षांब...
