न्यायाची २७ वर्षांची प्रतीक्षा; शेवटी तिसऱ्या मजल्यावरून उडी!
न्यायाची २७ वर्षांची प्रतीक्षा; शेवटी तिसऱ्या मजल्यावरून उडी!पुणे : “तारीख पे तारीख…” गेली २७ वर्षे कोर्टात न्यायाची वाट पाहणाऱ्या पक्षकाराने शेवटी मृत्यूचीच निवड केली. पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून नामदेव जाधव (रा. वडकी, पुणे) यांनी आयुष्य संपवलं. या हृदयद्रावक घटनेने न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जाधव गेल्या २७ वर्षांपासून जमीन व्यवहाराशी संबंधित एका वादग्रस्त प्रकरणात न्याय मिळण्याची वाट पाहत होते. प्रत्येक सुनावणीला केवळ “तारीख” मिळत होती, निकाल नव्हता. या सततच्या विलंबामुळे ते नैराश्यात गेले होते. बुधवारी सकाळी त्यांनी पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. म...
