Thursday, February 12

Tag: #premavarbolukahi

शॉट असावा तर असा….
Article

शॉट असावा तर असा….

शॉट असावा तर असा....      कधी कधी सचिन ला आणि मला काहीतरी वेगळं करायची हुक्की येते.. नवरा बायको असलो म्हणुन काय झालं , थोडा रोमान्स टिकवायचा असेल तर बदल हवा काहीतरी हटके हवं मग माझ्या लेखिकेच्या डोक्यात काहीतरी भन्नाट आयडीयाज येतात .. कधीतरी त्या बहरतात कधीतरी फेल जातात..   मुळात रसिकता ठासुन भरलेली असल्याने शब्दावर विनोद सुचतात आणि घरात हास्याचे फवारे उडतात.. इतर नवरा बायको सारखं रटाळवाणं लाइफ नक्कीच नाही.. पण कधीतरी करायला जातो गणपती आणि होतं माकड असही होतं..      काल संध्याकाळी असच काहीसं गमतीशीर घडलं.. सचिन मला म्हणाला , आज शॉट मारायचा का ??.. २५ वर्षानंतरही इश्य असा सहज शब्द तोंडुन आला.. सोनल तु आणि लाजतेस ??.. असा खडुस प्रश्न सचिनकडुन आला आणि मग मात्र मी जरा रागानेच त्याच्याकडे पाहिलं.. आमच्यात साधी धुसफुसही नसते त्यामुळे भांडण व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही.. लटक्या रागात बेडरुममधे गेल...