UPI युजर्ससाठी धक्का! 1 ऑक्टोबरपासून ‘ही’ लोकप्रिय सुविधा होणार बंद; NPCI चा मोठा निर्णय
UPI युजर्ससाठी धक्का! 1 ऑक्टोबरपासून ‘ही’ लोकप्रिय सुविधा होणार बंद; NPCI चा मोठा निर्णयनवी दिल्ली : भारतातील कोट्यवधी लोक दैनंदिन व्यवहारांसाठी यूपीआय (UPI) चा वापर करतात. किराणा सामान घेणे असो वा ऑनलाईन शॉपिंग करणे, मोबाईलमधून फक्त काही सेकंदांत व्यवहार पूर्ण होतात. मात्र, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आता ग्राहकांना बदल अनुभवावा लागणार आहे.1 ऑक्टोबर 2025 पासून UPI वरील P2P (पिअर-टू-पिअर) ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ सुविधा पूर्णपणे बंद केली जाणार आहे.काय आहे कलेक्ट रिक्वेस्ट सुविधा?UPI अॅप्स (PhonePe, Google Pay, Paytm इ.) द्वारे एखाद्या व्यक्तीकडून थेट पैसे मागण्यासाठी ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ पाठवता येत होती.उदाहरणार्थ, ₹500 मागायचे असल्यास रिक्वेस्ट पाठवली जात असे आणि समोरच्या व्यक्तीने UPI पिन टाकून ती मंजूर केली की पैसे खात्यात जमा ...
