Monday, October 27

Tag: MCX Gold Rate

सोन्या-चांदीच्या भावाला पंख; सणासुदीत नवा उच्चांक
News

सोन्या-चांदीच्या भावाला पंख; सणासुदीत नवा उच्चांक

सोन्या-चांदीच्या भावाला पंख; सणासुदीत नवा उच्चांकमुंबई : सणासुदीच्या दिवसांत सोनं-चांदीचे भाव अक्षरशः आकाशाला भिडले आहेत. भारतीय बाजारात दररोज नवे विक्रम प्रस्थापित होत असून, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सराफा बाजाराकडे आकर्षित होत आहेत. जागतिक आर्थिक अनिश्चितता, डॉलरची कमकुवत स्थिती आणि व्याजदर कपातीची अपेक्षा या घटकांमुळे सोनं-चांदीच्या किमतींमध्ये जोरदार वाढ झाली आहे.मंगळवारी, 30 सप्टेंबर रोजी सोन्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी उच्चांकावर पोहोचले. MCX वरील ऑक्टोबर फ्युचर्स सकाळी 9.30 वाजता तब्बल 1,252 रुपयांनी उसळले आणि प्रति 10 ग्रॅम 1,16,700 रुपयांवर स्थिरावले. दिवसाच्या सुरुवातीला सोनं 1,16,410 रुपयांवर उघडलं होतं. मागील सोमवारी ते 1,14,940 रुपयांवर बंद झालं होतं. म्हणजे एका दिवसात जवळपास 1,470 रुपयांची झपाट्याने वाढ झाली आहे.सोन्याबरोबरच चांदीनेही जोरदार उसळी घेतली....