Monday, October 27

Tag: #Marathwada Rain

राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारा
News

राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारा

राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारामुंबई, : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, विशेषत: मराठवाड्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 28 व 29 सप्टेंबर या दोन दिवसांत मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, उर्वरित महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यास आज रेड अलर्ट देण्यात आला असून, पुणे शहरात सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात दहा हजार क्युसेकहून अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल...