आठवणीतील अय्युब; माणुसकीच्या नात्याचा हात!
आठवणीतील अय्युब; माणुसकीच्या नात्याचा हात!दुपारच्या सत्रात फोन खणानला.. नंबर सेव्ह नसल्याने मी बराच वेळ वाजणाऱ्या बेल कडे बघत होतो. ट्रु कॉलर ने त्याचं काम चोख बजावले होते. नंबर जरी अननोन असला तरी अयुब अयुब असं काहीतरी ट्रु कॉलर स्पष्टपणे दिसत होते. शेवटी अगदी शेवटचा आचका घेऊन मोबाईल बंद होणार त्या शेवटच्या क्षणाला कॉल रिसीव्ह केला. तिकडून आवाज आला.. कोण बाबासाहेब भहुहे का..? मी फक्त हं.. केलं भाऊ मी अय्युब बोलतोय...! मी आपला मेंदूला जरा जोर देत विचार करू लागलो की, कोण अय्युब यार..? खरं तर अय्युब कोण..? हे काही माझ्या लवकर लक्षात येईना. बरं समोरच्याला मी तुम्हाला ओळखत नाही असंही म्हणू शकत नव्हतो.. या सर्व विचारात काही सेकंदाचा वेळ गेला. आणि समोरून तोच व्यक्ती बोलता झाला.. कदाचित त्याला ही कळलं असावं की मी त्याला ओळखलं नाही.. पुन्हा तोच बोलता होत म्हणाला की, अरे हो.. तुम्ही कस्काय मला ध...


