११७ वर्षांचा मतदार, ४० वर्षांचा मुलगा ; जयंत पाटलांचा बाण, आयोग झाला हैराण!
११७ वर्षांचा मतदार, ४० वर्षांचा मुलगा ; जयंत पाटलांचा बाण, आयोग झाला हैराण!मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना मतदार यादीतील घोळांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (१४ ऑक्टोबर) मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. बैठकीत मतदार यादीतील विसंगती, चुकीची नावे, पत्त्यांतील गोंधळ आणि अपूर्ण माहिती यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर तुफान हल्ला चढवला.जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, "मतदार यादीत इतका गोंधळ आहे की ११७ वर्षांच्या व्यक्तीला ४० वर्षांचा मुलगा दाखवला आहे. काही ठिकाणी एकाच घरात अनेक लोक दाख...


