मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांसाठी नवी सक्तीची अट
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांसाठी नवी सक्तीची अटमुंबई : राज्यातील महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना गेल्या वर्षी जुलै 2024 मध्ये सुरु झाली आणि अल्पावधीतच राज्यातील २ कोटींपेक्षा अधिक महिलांनी तिचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपयांची थेट आर्थिक मदत जमा केली जाते. गरजू महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात हा योजनेचा मुख्य हेतू आहे.मात्र, गेल्या काही दिवसांत या योजनेत अनेक गैरप्रकार उघड झाले. नुकत्याच झालेल्या ऑडिटमध्ये तब्बल २६.३४ लाख अपात्र लाभार्थी या योजनेत असल्याचे आढळले. त्यात अनेक पुरुषांचाही समावेश आहे. महिलांसाठी असलेल्या या योजनेत काहींनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याने शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत.नवी अपडेट : e-KYC अनिवार्यसरकारने सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) बंधनका...
