GPS तुमच्यावर ठेवतोय पाळत ! IIT दिल्लीचा खुलासा.!
मुंबई : तुमचा मोबाईल तुम्हाला फक्त लोकेशन दाखवत नाही, तर तुम्ही उभे आहात की झोपलेले, हे सुद्धा सांगतोय! IIT दिल्लीच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार, स्मार्टफोनमधील GPS (Global Positioning System) तंत्रज्ञान तुमच्या हालचाली ८७ टक्के अचूकतेने ओळखू शकते.प्रा. डॉ. स्मृती आर. सारंगी यांनी सांगितले की, तुम्ही जेव्हा एखादं ॲप डाउनलोड करून लोकेशन ‘Allow’ करता, तेव्हा GPS केवळ ठिकाणच नाही, तर तुम्ही मोठ्या घरात राहता की छोट्या, तुम्ही रेल्वे स्टेशनवर आहात की एअरपोर्टवर, इतकंच नव्हे तर तुमच्यासोबत किती लोक आहेत, हेही सांगू शकतो.GPS सिग्नल 10-12 सॅटेलाइट्सकडून मिळतो आणि त्यातून 32 पॅरामीटर्सवर आधारित मॅपिंग तयार होतं. यामुळे ॲप्स तुमच्या घराचा लेआऊट, हालचाली, व्यवहार आणि वैयक्तिक माहिती सहज ओळखू शकतात.डिजिटल पाळत टाळण्यासाठी IIT दि...
