काकांवर प्रेमाचा नव्हे, ‘बुक्क्यांचा वर्षाव’!
काकांवर प्रेमाचा नव्हे, ‘बुक्क्यांचा वर्षाव’!सोशल मीडियावर दररोज काही ना काही मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण हा व्हिडिओ पाहून इंटरनेटवर हशा पिकलाय. कारण यात आहे एक भन्नाट ट्विस्ट जिथे प्रेमाची सफर अचानक बुक्क्यांच्या वर्षावात बदलते!व्हिडिओमध्ये एक काका आणि काकू बाईकवर बसलेले दिसतात. गाडी सुरू होते, पार्श्वभूमीला रोमँटिक गाणं ‘ये वादा रहा’ चालू आहे आणि सगळं अगदी चित्रपटासारखं. पण काही क्षणातच दृश्य बदलतं काकूंचा मूड बिघडतो आणि त्या थेट काकांच्या पाठीवर हात उगारतात! बुक्क्यांचा असा पाऊस सुरू होतो की बाईक थांबवावी की जीव वाचवावा, हे काकांनाही कळेनासं होतं.दिल्ली नंबर प्लेट असलेल्या या बाईकवरील प्रसंगाने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. कुणी लिहिलं, “ही खरी लग्नानंतरची रिअॅलिटी!” तर कुणी म्हटलं, “काकूंचं प्रेमही ‘ॲक्शन पॅक...
