Monday, December 8

Tag: epilepsy

अपस्मार किंवा फिट येणे – Epilepsy
Article

अपस्मार किंवा फिट येणे – Epilepsy

आपण अनेकदा रस्त्यावर किंवा आजूबाजूला पाहतो की एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊन खाली पडते आणि ती व्यक्ती स्वतःचे हात आणि पाय अगदी घट्ट आवळून ठेवते, शरीराच्या विचित्र हालचाली करते आणि त्याच्या तोंडातून फेस किंवा लाळ येऊ लागतो. या विकारास फिट येणे, फेफरे येणे, मिर्गी किंवा एपिलेप्सी (Epilepsy) असेही म्हणतात.   अपस्मार हा चेतासंस्थेचा (मेंदूसंबंधी) आजार आहे. रुग्णास वरचेवर असे अपस्माराचे झटके येत असतात. जन्मतःच मेंदूत असणारा एखादा दोष किंवा डोक्याला अपघातामुळे झालेली इजा यांमुळे अशा प्रकारचे फेफरे किंवा झटके येतात. अपस्मार हा कोणत्याही वयातील लोकांमध्ये आढळतो, अनेकदा लहान मुलांमध्ये असणारा अपस्माराचा त्रास हा वयानुसार वाढत जातो. या आजारात येणाऱ्या फिटस् टाळता येत नसल्या तरी योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण ठेवता येते.   *अपस्मार आजाराची लक्षणे - Epilepsy symptoms : ◆रुग्णाचा अचानकपणे शरीराचा सं...