Thursday, January 22

Tag: Dr Babasaheb Ambedkar Marathwada University

‘लॉंगमार्चची युगयात्रा’ ग्रंथाचे 24 जानेवारीला बडनेऱ्यात प्रकाशन
News

‘लॉंगमार्चची युगयात्रा’ ग्रंथाचे 24 जानेवारीला बडनेऱ्यात प्रकाशन

‘लॉंगमार्चची युगयात्रा’ ग्रंथाचे 24 जानेवारीला बडनेऱ्यात प्रकाशनअमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या ऐतिहासिक संघर्षाचे सखोल दस्तऐवजीकरण करणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आंदोलन : एक क्रांतीपर्व” हा ग्रंथ प्रा. प्रकाश विश्वनाथ बोरकर यांनी लिहिला असून, गौरव प्रकाशन अमरावती यांनी तो प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा शनिवार, दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता बडनेरा येथील सार्वजनिक कपिल मंडळ सभागृह, अशोक नगर, नवी वस्ती येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान इ. मो. नारनवरे (सुप्रसिद्ध साहित्यिक, नागपूर) राहणार असून, ग्रंथाचे प्रकाशन आयुष्यमान ताराचंद्र खांडेकर (फुले–आंबेडकर चळवळीचे भाष्यकार) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे....