Sunday, October 26

Tag: #Dimple Publication

कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिक
Article

कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिक

कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिककला ही आत्माविष्काराची पहिली पायरी आहे, प्रत्येक माणसाच्या अंगी एकतरी कला असावी. माणसाला कधीही उपाशी ठेवत नाही. कला निराशामय काळोखातील एक प्रकाशमान बिंदू आहे, जो माणसाला वादळातील पणतीप्रमाणे सतत संघर्ष करत जगण्याची प्रेरणा देतो. अशा सुंदर लालित्यपूर्ण लेखन करणाऱ्या पुसद जि यवतमाळ येथील लेखिका निशा डांगे यांची कपाळ गोंदण ही ललितलेख असलेली साहित्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. लेखिकेने स्त्री जीवनातील अनेक सुखदुःखाच्या हिंदोळ्यावरील आलेले अनुभव या कलाकृतींमधून मांडले आहेत.कपाळ गोंदण या कलाकृतीतील ललित साहित्याच्या अनुषंगाने मुखपृष्ठावर साकारलेल्या भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका स्त्रीच्या प्रातिनिधिक चित्राने स्त्री जीवनातील अनेक गोष्टींना अधोरेखित केले आहे. ही कलाकृती स्त्री जीवनाला केंद्रस्थानी ठेवून तिच्या भोवती ...