टप्पू-बबिताच्या साखरपुड्याच्या अफवेवर भव्य गांधीचा खुलासा!
टप्पू-बबिताच्या साखरपुड्याच्या अफवेवर भव्य गांधीचा खुलासा!मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील ‘टप्पू’ आणि ‘बबिता’ म्हणजेच भव्य गांधी आणि मुनमुन दत्ता यांचा गुपचूप साखरपुडा झाला का? इंस्टाग्राम, यूट्यूब आणि X (पूर्वीचं ट्विटर) वर फोटो, रील्स, हेडलाईन्सचा पूर आला होता. लोकांचं कुतूहल वाढत होतं, काही जण या नात्याचं स्वागत करत होते, तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं. पण अखेर या अफवांवर स्वतः ‘टप्पू’ उर्फ भव्य गांधीनेच विराम दिला आहे.“मीही त्या बातम्या वाचून चकित झालो!” भव्य म्हणतो, “पहिली गोष्ट म्हणजे, ज्या टप्पूचा साखरपुडा झाल्याचं लोक म्हणतायत, तो मी नाही. दुसरी म्हणजे, ही अफवा बडोद्यातून पसरली. आईला अचानक फोन आला ‘अरे, तुमच्या मुलाचा साखरपुडा झाला का?’ ती एवढी चिडली की तिनेच विचारलं, ‘तुम्हाला अक्कल आहे का?’ हे सगळं...
