महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: काल आज, आणि उद्या…
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: काल आज, आणि उद्या...बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज,काल ,आणि ऊद्या कसे तारणारे आहेत..या विषयी सांगायचे झाल्यास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ एका विशिष्ट काळापुरते मर्यादित नसून आणि त्यांचे कार्य एका विशिष्ट समुदायापुरते किंवा वर्गापुरते नसून वैश्विक पातळीवर वाखाणण्यासारखे आहेत आहेत. अखिल विश्वाला तारणारे आहेत ..काल विषमतेच्या अंधारातून बाहेर काढणारा प्रकाश भूतकाळात, जेव्हा भारतीय समाज जातिव्यवस्थेच्या आणि विषमतेच्या बेड्यांत अडकला होता, तेव्हा बाबासाहेबांचे विचार हे मुक्तीचे साधन ठरले.चवदार तळ्याचा सत्याग्रह असो वा काळाराम मंदिर प्रवेश, त्यांनी माणसाला त्याच्या अस्तित्वाची आणि हक्कांची जाणीव करून दिली. त्यांनी दलित आणि बहुजन समाजाला हे पटवून दिले की, शिक्षण हे वाघिणीचे 'दूध' आहे आणि ते प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार ...
