Saturday, January 17

Tag: #AsiaCup2025 #TeamIndia #INDvsPAK #CricketNews #SuryakumarYadav #MohsinNaqvi #AsiaCupFinal

आशिया कप २०२५ ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाचा नकार
News

आशिया कप २०२५ ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाचा नकार

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. हा विजय ऐतिहासिक ठरला असला तरी सामन्यानंतरचा प्रसंग अधिक गाजला. कारण भारतीय संघाने विजेत्यांची ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.प्रेमदासा स्टेडियमवर सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरणाचा समारंभ जवळपास तासभर उशिरा सुरू झाला. या विलंबामुळे मैदानावर गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन तसेच पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या हस्ते द्यायची होती. नक्वी हे भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जात असल्याने भारतीय संघाने सामूहिकरित्या व्यासपीठावर जाण्यास नकार दिला.सूत्रसंचालक सायमन डुल यांनी समारंभ थांबवताना जाहीर केले की, “भारतीय संघ आज रात्री पारितोषिकं स्वीकारणार नाही.” परिणामी संघाचा सामूहिक फोटो घेण्यात आला नाह...