भीमनगर नालंदा बुद्ध विहाराची कंपाऊंड वॉल धोकादायक; त्वरित काम सुरू करण्याची मागणी
भीमनगर नालंदा बुद्ध विहाराची जीर्ण कंपाऊंड वॉल – नागरिकांचा निवेदनाद्वारे निषेधअमरावती (प्रतिनिधी) : भीमनगर परिसरातील नालंदा बुद्ध विहाराच्या कंपाऊंड वॉलची अवस्था अतिशय जीर्ण व जर्जर झाली असून ती कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणी लहान मुले नेहमी खेळत असतात, त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून स्थानिक नागरिकांनी तातडीने भिंतीचे बांधकाम सुरू करण्याची मागणी केली आहे.या संदर्भात खासदार बळवंत वानखडे यांनी दिनांक 24 मार्च 2025 रोजी महानगरपालिकेला पत्र देऊन भिंतीचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहन केले होते. मात्र, अद्यापही काम सुरू न झाल्याने परिसरातील नागरिकांत नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उपायुक्त नरेंद्र वानखडे यांना निवेदन देऊन परिस्थितीची गंभीर दखल घेण्याची विनंती करण्यात आली. उपायुक्त वानखडे यांनी तात्काळ निवेदनाची नोंद घेत संबंधित अधिकारी व अ...
