फसवणूक…
फसवणूक.."अहो, संकेत काय म्हणतोय एकलं का?" रमाने आपल्या नवऱ्याकडे पाहून विचारले."
पेपर वाचण्यात दंग असलेल्या मनोहरने डोके वर न करताच विचारले, "काय म्हणतोय तुमचा लाडोबा?"
"इथल्या पेक्षा तिथे परदेशात चांगली नोकरी मिळतेय, तिथे जायचं म्हणतोय"
"हां! असे अचानक! काय रे, इथे नोकरी करणार होतास ना? टाटा कंपनीतून बोलावणं आलं म्हणून सांगत होतास ना? मग हे खूळ कसं बरं आलं?"
"बाबा, इथे फार स्कोप नाही हो. इथे जे कमवायला दहा वर्षे लागतील ते मी अमेरिकेत दोन वर्षात कमवेन."
एवढ्यात संकेतच्या बाबांचे मित्र, सुरेश आले. "काय रे काय एवढा वार्तालाप चाललाय? घरात शिरताच त्यांनी विचारले.सुरेश आणि मनोहर बालमित्र. शाळा, कॉलेज आणि नोकरी सुध्दा दोघांनी एकाच कंपनीत केली. दोघांनी ठरवून पुण्यात आपली घरे ही जवळ जवळ घेतली. दोघांच्या बायका मात्र वेगवेगळ्या प्रदेशातल्या. एक कोकणातली मराठमोळी तर सुरेशची गुजराथी. एक झूणका, का...






