Monday, October 27

Tag: #AmitabhBachchan #BigBDiwaliGift #DiwaliBonus #BollywoodNews #BigB #AmitabhBachchanControversy #ViralVideo #BollywoodBuzz #Diwali2025 #EntertainmentNews #SocialMediaReaction

अमिताभ बच्चन यांचा ‘दहा हजारांचा’ दिवाळी बोनस; जनता म्हणते – ‘बिग बी की स्मॉल गिफ्ट?
News

अमिताभ बच्चन यांचा ‘दहा हजारांचा’ दिवाळी बोनस; जनता म्हणते – ‘बिग बी की स्मॉल गिफ्ट?

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि भेटवस्तूंचा उत्सव. पण यंदा सोशल मीडियावर मात्र बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या दिवाळी भेटीवरून वाद पेटला आहे.अमिताभ बच्चन यांनी आपल्या घरातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचा डबा आणि 10,000 रुपयांची रोख रक्कम दिल्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. एका कंटेंट क्रिएटरने जुहू येथील ‘जलसा’ बंगल्या बाहेर हा व्हिडिओ शूट केला असून, कर्मचाऱ्यांपैकी एकाने स्वतः ही माहिती दिली आहे.हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी बिग बींवर टीकेची झोड उठवली आहे. “बिग बींची संपत्ती जशी प्रचंड, तशी भेट मात्र ‘मिनिमल’ का?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. एका युजरने लिहिलं, “ज्या कर्मचाऱ्यांनी वर्षभर त्यांच्यासाठी काम केलं, त्यांना फक्त 10 हजार? लाजिरवाणं आहे हे!”तर काहींनी बच्चन यांच्या बाजूनेही मत मांडलं. “भेट किती दिली हे न...