अमर्त्य सेन : भारतरत्न व नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ, मानवी विकासाचे जागतिक विचारवंत
अमर्त्य सेन हे जागतिक कीर्तीचे मानवतावादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आहेत.त्यांचा जन्म सन : १९३३ सालातील नोव्हेंबर महिन्याच्या तीन तारखेला झाला. आज दि.३ नोव्हेंबर २०२५ ला असलेल्या त्यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्ठचिंतन॥नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना 'अमर्त्य' अर्थात अमर हे नाव दिले होते. अमर्त्य सेन यांचे माध्यमिक शिक्षण ढाक्का येथील सेंट ग्रेगरी हायस्कूलमध्ये झाले आणि नंतर त्यांनी विश्वभारती आणि कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून शिक्षण घेतले.सन : १९५३ मध्ये त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्रात बी.ए. पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले आणि केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमधून सन : १९५९ मध्ये त्यांनी एम.ए.आणि पी.एच.डी. पदव्या प्राप्त केल्या.अवघ्या २३ व्या वर्षी सेन जादवप...
