Sunday, October 26

Tag: #AkolaNews #WrestlingScandal #MaharashtraNews #SportsCrime #ViralVideo #WrestlingCoach #ChildSafety #MaharashtraShock #KunalMadhave

कुस्तीचा रंग की कुर्त्याविना संग? प्रशिक्षकाच्या ‘नग्न’ कारनाम्याने महाराष्ट्र दंग!
News

कुस्तीचा रंग की कुर्त्याविना संग? प्रशिक्षकाच्या ‘नग्न’ कारनाम्याने महाराष्ट्र दंग!

नग्नकुस्तीचा रंग की कुर्त्याविना संग? प्रशिक्षकाच्या ‘नग्न’ कारनाम्याने महाराष्ट्र दंग!अकोला : जिल्ह्यातील आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत घडलेला एक विकृत प्रकार सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडत आहे. कुस्तीच्या रिंगणात घाम गाळायचा, पण इथे तर संस्कारच गाळले गेले! चौदा वर्षांच्या अल्पवयीन कुस्तीपटूचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या प्रशिक्षकाच्या कारनाम्याने पालक, शिक्षक आणि क्रीडाप्रेमी थक्क झाले आहेत.अकोला पोलिस हॉलमध्ये जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्यावतीने ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी आंतरशालेय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नेहमीप्रमाणे कुस्तीपटूंचं वजन घेण्याची प्रक्रिया सुरू होती. तेव्हा उपस्थित असलेल्या प्रशिक्षक कुणाल माधवे यांनी चौदा वर्षांच्या विद्यार्थ्याला विवस्त्र अवस्थेत उभं करून त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपला. एवढ्...