अकोल्यात तरुणाचा साडी नेसून गांधीगिरी आंदोलन : रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील टाकळी निमखर्दा गावात रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न चांगलाच गंभीर झाला आहे. गावातील नागरिकांना मागील दोन वर्षांपासून उखडलेल्या रस्त्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अक्षय साबळे या तरुणाने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. त्यांनी थेट साडी नेसून गांधीगिरी आंदोलन करत अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात पोहोचून ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या.दोन वर्षांपासून अपूर्ण पाइपलाइनचे कामगावामध्ये ईगल इन्फ्रा कंपनी पाणीपुरवठा योजनेसाठी पाइपलाइन टाकण्याचे काम करत आहे. हे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असले तरी आजतागायत पूर्ण झालेले नाही. पाइपलाइन घालण्यासाठी खोदलेले रस्ते मात्र दुरुस्त करण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात गावकऱ्यांना चिखल, घसरगुंडी आणि वाहतुकीची अडचण भोगावी लागत आहे.ग्रामस्थांची दैन्यावस्...
