Monday, October 27

Tag: होता

आमचाही एक जमाना होता.!
Article

आमचाही एक जमाना होता.!

आमचाही एक जमाना होताबालवाडी हा प्रकार नव्हता, पुढे 6 वर्षा नंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे , सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती, मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.पास / नापास हेच आम्हाला कळत होतं... टक्केचा आणि आमचा संबंध कधीच नव्हता.शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची.... कारण  "ढ" असं हीणवलं जायचं...पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता...कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं.दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा...वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे. आई ...
आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !
Article

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं ! आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ? पाठीवरून हात कुणी फिरवायचा ? निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची .... थोडक्यात काय तर दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे ! लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतातहे वाचा – पिक्चर रस्त्य...