हेळवी; आपल्या वंशाची जिवंत परंपरा!
हेळवी; आपल्या वंशाची जिवंत परंपरा!आपल्यापैकी बरेचजण आपल्या आजोबांपर्यंतचा वंश सांगू शकतात. पण त्या पुढे गेलं की आठवण धूसर होते. कोण होते आपल्या पणजोबा, त्यांचे वडील, त्यांच्या आधीचे पूर्वज — ही सगळी माहिती कालांतराने हरवत जाते. पण काही लोक असे आहेत जे शेकडो वर्षांपासून हे सगळं जतन करून ठेवत आले आहेत. त्यांना आपण हेळवी म्हणतो. हेळवी म्हणजे फक्त वंश सांगणारे नव्हेत, ते आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहेत.हेळवी हे पारंपरिक वंशावळ सांगणारे आणि वंशाची माहिती लिहून ठेवणारे लोक आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र सीमाभाग, विशेषतः धारवाड, बेलगाव, बिदर, विजापूर, करवार या भागात हेळवी समाजाचे वास्तव्य आहे. काही ठिकाणी त्यांना भाट असेही संबोधले जाते. त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे कुटुंबांची वंशावळ लिहून ठेवणे आणि ती पुढील पिढ्यांना सांगणे. पूर्वी जेव्हा लग्नसमारंभ व्हायचे, तेव्हा हेळव...
