नांदेडमध्ये ५२ एकरांवर ‘हिंद-दी-चादर’चा भव्य ऐतिहासिक सोहळा | ८–१० लाख भाविकांसाठी प्रशासन सज्ज
नांदेडमध्ये ५२ एकरांवर ‘हिंद-दी-चादर’चा भव्य ऐतिहासिक सोहळा | ८–१० लाख भाविकांसाठी प्रशासन सज्जनांदेडमध्ये साकारणार ५२ एकरांवर 'हिंद-दी-चादर'चा भव्य ऐतिहासिक सोहळा !८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहितीलातूर, : शीख धर्माचे नववे गुरु 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरी एका ऐतिहासिक पर्वाची साक्षीदार होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ५२ एकरांच्या विशाल परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली. ५२ एकरांवर अध्यात्मिक नगरी या सोहळ्यासाठी प्रशासनाने ५२ एकर जागेवर भव्य मंडप उभारला आहे. भाविकांच्या सोयीसाठी ८ मह...
