स्वातंत्र्य कधी आम्हाला मिळेल काय ?
स्वातंत्र्य कधी आम्हाला मिळेल काय ?१५ ऑगस्ट राष्ट्रीय महोत्सव म्हणजे काय? या दिवसाचे महत्त्व कोणाला माहित नाही असे या भारतात तरी शोधून कोणीच सापडणार नाही.! ते तर सर्वांना माहीतच आहे १९४७ साली आपला भारत देश स्वतंत्र झाला, असे कोणीही नाही ज्या व्यक्तीला हे माहीत नसेल, परंतु तुम्हाला खरंच असे वाटते का, की आपला देश स्वतंत्र झाला आहे, आम्हा मुलींना तरी असे अजून तरी तसे अजिबातच वाटत नाही...!मुलींनी स्वप्न पाहणे वाईट आहे का? व ते स्वप्न अस्तित्वात आणणे हा गुन्हा आहे का ? स्वप्न पाहणे गुन्हा आहे असेच मला तरी वाटते, प्रत्येक मुलगी घराबाहेर पडण्या अगोदर सतरा वेळा विचार करते मग ती बाहेर पडते त्यात पण एखादा माणूस तिच्याकडे पाहत असला तर ती तिचा अवतार नीट आहे का ते पाहते, कपडे छोटे वाटत आहे का ? घातलेले कपडे खूप फिट आहे का? केस नीटनेटके आहेत का? कुठे काही लागलं आहे का? हे ती बघते परंतु तिच्या वेशभूष...
