सोनं आणि संघर्ष: एका पानविक्री कुटुंबाचा संघर्ष.!
सोनं आणि संघर्ष: एका पानविक्री कुटुंबाचा संघर्ष.!दसरा म्हणजे शहरात सोनं, दागिने, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि आनंदाचा सण. लोक खरेदी करतात, घर सजवतात आणि नवे कपडे घालतात. पण बडनेरच्या चावडी चौकात बसलेलं जनूना गावचं एक कुटुंब या चमकत्या आनंदापासून दूर, एका वेगळ्या संघर्षात दिसून आले. हे कुटुंब जंगलात तीन-चार दिवस राबून, काटेरी झुडपांतून आपट्याची पानं बाजारात आणतात. शहरातील लोक ती पानं सोन्याचे प्रतीक म्हणून घेतात, शुभेच्छांसाठी जपतात. पण जनूना गावातील कुटुंबासाठी ती पानं म्हणजे जीवनाचा आधार. ह्या मेहनतीतून त्यांना मिळतो थोडासा पैसा, घरसाठा, मुलांची शाळेची फी, औषधे आणि कपडे.सोनं विकलं… हा शब्द ऐकताना शहरातल्या लोकांच्या डोळ्यासमोर संपत्ती, चमचमणारे दागिने, सुवर्णमयी वस्तू उभी राहतात. पण या कुटुंबासाठी हे “सोनं” नाही; हा फक्त पोटाच्या तोंडभराईसाठी, मुलांच्या शाळेसाठी, घराच्या गरजांस...
