सुपरफास्ट..!
सुपरफास्ट..!भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर मधु केव्हाचा उभा होता. सारख्या इकडून तिकडं रेल्वे गाड्या सुटायच्या त्याला तिथून जळगावला जायचं होतं. आज तो काहीतरी वेगळ्याच तंद्रीत होता. एक्सप्रेस गाडीनं गेलं म्हणजे वेळ वाचेल असं त्याच्या डोक्यात होतं. असंच मागच्या आठवड्यात तो इथूनच पॅसेंजरने बसला होता पण अर्ध्या तासाचा प्रवास त्याला एक सव्वा तास गेला. मागून येणारी एक्सप्रेस किंवा सुपरफास्टगाडी पुढं जाऊन द्यायची तोपर्यंत पॅसेंजरला असंच साईट पटरीवर ताटकळत थांबावं लागायचं! मागची गाडी जेव्हा पुढे निघून जायची तेव्हा गाडीतला प्रत्येक जण मनात स्वतःशीच खिन्न होऊन गाडीच्या खिडकीतून बघत बसायचा. आज म्हणूनच मधुनं एक्सप्रेसमध्ये बसायचं निर्णय घेतला होता.सुट्टीचा दिवस असल्यानं स्टेशनवर येणारा जाणाऱ्यांची आज खूपच गर्दी होती. गाडी आली म्हणजे लगेच उतरणाऱ्या प्रवाशांचा लोंढाच्या लोंढा दादरवरून खाली यायचा. तिथून प...
