Monday, January 19

Tag: साहेब

एकच साहेब बाबासाहेब
Article

एकच साहेब बाबासाहेब

एकच साहेब बाबासाहेब           ३१ जुलै १९५६ ची सायंकाळ. नानकचंद टपाल घेऊन बाबसाहेबांकडे आलेले. बाबासाहेब ओसरीत बसून स्टूलवरच्या उशीवर पाय ठेवून नानकचंद यांना डिक्टेशन देत होते. मधातच त्यांनी डोळे, डोके खुर्चीच्या पाठीवर टेकवले आणि त्यांना झोप लागली. थोड्या वेळाने त्यांना पुन्हा जाग आली. रत्तु यांनी वाचून दाखविलेल्या पत्रांची उत्तरे त्यांनी भराभर डिक्टेट केली. नंतर नानकचंद यांच्या खांद्यावर हात ठेवून ते झोपायच्या खोलीत गेले आणि अंथरुणावर त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या दुसऱ्या हातातील पुस्तक गळून पडले. काही वेळ ते काहीच बोलले नाही. नानकचंद घाबरले. त्यांनी डोक्याला, पायांना मसाज केले. त्यामुळे बाबासाहेब थोडे शांत वाटत होते.गेल्या काही दिवसांपासून हे घडत होतं. शेवटी मोठया धाडसाने नानकचंद यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला, "सर, अलीकडे आपण एवढे दुःखी आणि खिन्न का दिसता ? अधूनमधून डोळ्...